Ad will apear here
Next
‘समाजाची वाटचाल शब्दहीन संवादाकडे’
डॉ. गणेश देवी यांचे मत
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कै. ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात ‘माध्यमांची बदललेली भाषा’ या विषयी बोलताना डॉ. गणेश देवीपुणे : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माणसांमधील संवाद कमी झाला आहे. माणसे एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाइल आणि त्यासारख्या इतर तंत्रज्ञानावर अधिक वेळ घालवत आहेत. संवाद साधण्यासाठी शब्दांपेक्षा आज चित्र आणि दृश्यांचा अधिक वापर होत असून, समाजाची वाटचाल शब्दहीन संवादाकडे होत आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बुधवारी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कै. ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात ‘माध्यमांची बदललेली भाषा’ या विषयावर डॉ. देवी बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि खजिनदार सुनील जगताप या वेळी उपस्थित होते.  

डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आज तरुणांना नोकरी नसेल, तर त्याचा राग येत नाही; परंतु इंटरनेटचा वेग कमी झाला तर त्याचा राग येतो. हा मानसिकतेचा नव्हे, तर समाजाच्या बदलत्या गरजांचा परिणाम आहे. संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज कमी भासत आहे. त्यामुळे समाजाचीही भाषा बदलत आहे, याचेच प्रतिबिंब आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये आणि वर्तमानपत्राच्या भाषेमध्येही दिसत आहे. वर्तमानपत्रांपुढे हे मोठे आव्हान आहे. वर्तमानपत्रात दैनंदिन प्रसिद्ध होणाऱ्या भाषेत किती चुका असतात, यापेक्षा त्यात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, विश्लेषण हे किती निष्ठेने लिहिले आहे, ते महत्त्वाचे आहे.’ 

‘पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे; मात्र जगभरातील लोकशाहीचे स्वरूप बदलले आहे. वर्तमानपत्रांची आर्थिक नीतीही बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीत पत्रकारितेची निष्ठा टिकून राहणे महत्त्वाचे आहे,’ असेही डॉ. गणेश देवी यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZULCD
Similar Posts
‘विवेकवादी तत्त्वज्ञानाची गरज’ पुणे : ‘डॉ.अब्दुल कादर मुकादम यांचे ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ हे पुस्तक मराठी भाषेत इस्लामी तत्वज्ञानाची मांडणी करणारे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. संवेदनशील विषयावर त्यांनी केलेली मांडणी वस्तुनिष्ठ आणि विवेकवादी परंपरा पुढे नेणारी आहे. पुरोगामी संघटनांनी, इस्लामविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने
‘आचार्य अत्रे साहित्य दर्शन’ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद पुणे : लेखक, विडंबनकार, नाटककार, झुंजार पत्रकार, घणाघाती वक्ते, शिक्षणतज्ज्ञ, उत्तम चित्रपट कथाकार, निर्भीड राजकारणी आणि जागरूक समाजसुधारक असे विविध पैलू लाभलेले आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक असामान्य, उत्तुंग व्यक्तिमत्त्व! आचार्य अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे
‘मोबाइलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण’ पुणे : ‘मोबाइलच्या अतिवापरामुळे, तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक संस्था व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language